बी. आर्च संपूर्ण झाल्यावर मी अहमदाबाद मध्ये स्टुडिओ ९१९ आर्किटेक्टस मध्ये तीन वर्ष जॉब केला, आणि आता १ जानेवारी पासून मी “त्रिकालदर्शी आर्किटेक्टस” या नावाने माझी फर्म माज्या गावाला चालू केली आहे.
हा चालू वर्क बद्दल बोलायचं झालाच तर इकडे थोडा कमीच काम मिळत मला कारण इकडे लोकांना आर्किटेक्टवर हि एक पदवी आहे आणि तो आपल्याला आपला घर डिझाईन करून देतो हेच माहित नाही. ते सिविल इंजिनिअरलाच प्राधान्य देतात. तरी पण मला एक प्रोजेक्ट करायला मिळाला आहे तो खालील प्रमाणे आहे.
बक्षिसे म्हणाल तर अजूनतरी एकही बक्षीस मला मिळाला नाही. पण हा अहमदाबाद ला असताना गुजरात गव्हर्नमेंट बरोबर दांडी मेमोरियल नावाचा एक प्रोजेक्ट डिझाईन करायला मिळाला आणि तो करताना गांधीजी ना अभ्यासायला सुद्धा मिळालं आणि एक चांगला बदल माज्यामध्ये झाला आणि मला समाजसेवेची आवड निर्माण झाली. हा आता मी गेल्या काही वर्ष्यांपासून माज्या गावात समाजहिताचे वेगवेगळे प्रयोग करत असतो. आणि हे करत असताना मला तालुका स्तरावर ” समाज गौरव पुरस्कार ” देऊन गौरवण्यात आले.